Chinchwad By-Election: चिंचवड विधानसभा मतदारसंघातच्या भाजप उमेदवार अश्विनी जगताप आहेत तरी कोण?

सरकारनामा ब्यूरो

चिंचवड मतदार संघासाठी भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी अर्ज भरला आहे. 

Ashwini Laxman Jagtap | Sarkarnama

आश्विनी लक्ष्मण जगताप भाजपकडून पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांची निवडणूक लढणाची ही पहिलीच वेळ आहे.

Ashwini Laxman Jagtap | Sarkarnama

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अवघ्या १५ दिवसात अनपेक्षितपणे पोटनिवडणूक जाहीर झाली. 

Ashwini Laxman Jagtap | Sarkarnama

आश्विनी जगताप या मूळच्या साताऱ्याच्या आहेत. त्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची लेक आहेत.

Ashwini Laxman Jagtap | Sarkarnama

"प्रतिभा महिला प्रतिष्ठान"च्या अध्यक्षा आहेत. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला बचत गटांचं जाळं त्यांनी पसरवलं आहे.

Ashwini Laxman Jagtap | Sarkarnama

महिलांच्या प्रश्नासाठी आणि विकासासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे.

Ashwini Laxman Jagtap | Sarkarnama

सामाजिक आणि धार्मिक कार्यात त्या सक्रिय असतात.

Ashwini Laxman Jagtap | Sarkarnama

लक्ष्मण जगताप निवडणुकीस उभे असताना त्या प्रचारात सक्रिय असायच्या.

Ashwini Laxman Jagtap | Sarkarnama