Anuradha Dhawade
खलिस्तानी चळवळीचा म्होरक्या अमृतपाल सिंगमुळे सध्या पंजाबमधील वातावरण चांगलेच तापले आहे.
त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची मोठी फौज कामाला लागली आहे.पण हा अमृतपाल सिंग आहे कोण ?
अमृतपाल सिंगचा जन्म 18 जानेवारी 1993 रोजी अमृतसर जिल्ह्यातील जलूपूर खेडा गावात झाला.त्याच्या वडिलांचे नाव तरसेम सिंग आणि आईचे नाव बलविंदर कौर आहे.
अमृतपाल सिंग काही वर्षे दुबईत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता.पण काही दिवासांपूर्वीच तो भारतात परतला.
इंटरनेटच्या माध्यमातून त्याने खलिस्तान,भिंद्रनवाले आणि त्यासंबंधीची माहिती मिळवली
गेल्या वर्षी वारिस पंजाब दे यां संघटनेचे संस्थापक दीप सिद्धू यांच्या निधनानंतर, अलीकडेच त्याची 'वारीस पंजाब' या संघटनेच्या प्रमुखपदी निवड झाली.
विशेष म्हणजे दिप सिंग सिद्धू आणि अमृतपाल सिंग यांची कधीही भेट झाली नव्हती. ते दोघेही सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात होते
अमृतपाल हा खलिस्तान समर्थक दहशतवादी जनरल सिंग भिंद्रनवाला याचा भाग आहे. आजकाल त्याची भिंद्रनवाले 2.0 अशीही त्याची ओळख निर्माण झाली आहे.
या संघटनेच्या प्रमुखपदी अमृतपाल सिंगची निवड झाली तेव्हा त्यांनी भिंद्रनवाले हे माझे प्रेरणास्थान असून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मी चालणार असल्याच्या संकल्प त्याने केला.
अमृतपाल सिंह खलिस्तानची मागणी करत असून अजनाला घटनेपासून पंजाब पोलीस त्याच्या शोधात आहेत. अमृतपाल सिंगच्या साथीदारांना पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.