Karnataka CM: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबरोबर मंत्रिपदाची शपथ घेणारे आठ आमदार कोण आहेत?

Ganesh Thombare

सरकार स्थापन

कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला. त्यानंतर आज कर्नाटकात काँग्रेसचं सरकार स्थापन झालं.

मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ सिद्धरामय्या यांनी घेतली.

उपमुख्यमंत्रीपदी शिवकुमार

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ डी.के.शिवकुमार यांनी घेतली.

आठ आमदारांनी घेतली शपथ

कर्नाटकच्या नव्या सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याबरोबर 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

ते आठ आमदार कोणते?

जी.परमेश्वरा, के.एच.मुनियप्पा, के.जे.जॉर्ज, एम.बी.पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियांक खरगे, रामलिंग रेड्डी आणि बी. झेड झमीर अहमद खान यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली.

शपथविधी सोहळ्याला उपस्थिती

कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जून खर्गे उपस्थित होते.

जनतेचे आभार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले.

Next : ठाकरे - शिंदेंच्या राजकारणात पितापुत्र एकमेकांविरोधात लढणार का ?