Anuradha Dhawade
महिला आरक्षणासाठी तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या के. कविता दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात आंदोलन करत आहेत.
देशातील १८ पक्षांनी या उपोषणाला पाठींबा दिला आहे. पण तुम्हाला माहितीये का कोण आहेत या के. कविता?
13 मार्च 1978 रोजी करीमनगर येथे के.के. चंद्रशेखर राव आणि शोभा यांच्या घरी कविता यांचा जन्म झाला.
त्यांनी व्हीएनआर विज्ञान ज्योती इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी पूर्ण केले.
दक्षिणी मिसिसिपी विद्यापीठातून संगणक विज्ञानात मास्टर्स पूर्ण केले. 2004 मध्ये भारतात परतण्यापूर्वी त्यांनी अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरची पदवी संपादन केली.
9 मार्च रोजी कविता यांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत दिल्लीत केंद्र सरकारच्या (मोदी सरकार) भूमिकेचा निषेध केला.
भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्यास महिला आरक्षण लागू करू, असे आश्वासन भाजपने दिले होते.
पण भाजप 2014 आणि 2019 मध्ये दोनदा पूर्ण बहुमताने सत्तेत राहिला पण त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही.
कविता यांच्या या मागणीला आम आदमी पक्ष, अकाली दल, पीडीपी, तृणमुल कॉंग्रेस, JDU, NCP, CPI, RLD, NC यांच्यासह समाजवादी पक्षाने पाठींबा दिला आहे.
आगामी काळात केंद्र सरकारसाठी हे उपोषण डोकदुखी ठरण्याची शक्यता आहे.