National Party Status : भारतात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कधी मिळतो? सध्या किती पक्षांना राष्ट्रीय दर्जा?

सरकारनामा ब्यूरो

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे.

National Party | Sarkarnama

शरद पवारांसाठी मोठा धक्का...

आयोगाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

National Party | Sarkarnama

आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष

एकीकडे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करतानाच आयोगानं दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला आहे.

National Party | Sarkarnama

राष्ट्रीय दर्जासाठी निकष काय?

एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कधी दिला जातो. आणि त्यासाठी निवडणूक आयोगाचे निकष काय असतात?

National Party | Sarkarnama

लोकसभा आणि विधानसभेतील मतांची 'ही' असतात गणितं..

विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते मिळाली पाहिजेत. लोकसभा निवडणुकीत कमीत कमी 4 जागा मिळाल्या पाहिजेत. पक्षाला कमीत कमी 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे.

National Party | Sarkarnama

'एवढ्या' राज्यात हवा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता...

पक्षाला कमीत कमी 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे.

National Party | Sarkarnama

प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी...

प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 2 जागा मिळाल्या पाहिजेत.

National Party | Sarkarnama

राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाल्याचे फायदे :

राखीव निवडणूक चिन्ह मिळते,पक्षाच्या कार्यालयासाठी subsidized दरांमध्ये जमीन मिळते.दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर मोफत प्रक्षेपण होते. निवडणूक आयोगाकडून निवडणूक याद्यांचं मोफत वितरण होते.

National Party | Sarkarnama

देशात किती राष्ट्रीय पक्ष...

भारतात सध्या एकणू 6 राष्ट्रीय पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. त्यात बहुजन समाज पक्ष, भारतीय जनता पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट),काँग्रेस, नॅशनल पीपल्स पार्टी, आम आदमी पक्ष यांचा समावेश आहे.

National Party | Sarkarnama

या तीन पक्षांचा दर्जा रद्द...

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आणि सीपीय अर्थात भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. 

National Party | Sarkarnama

Next : सावरकर ते मोदींवरील वादग्रस्त विधानांमुळे काँग्रेसला अडचणीत आणणारे मणिशंकर अय्यर...