Lokpal Bill : विधानसभेत मंजूर झालेले लोकायुक्त विधेयक काय आहे?

Anuradha Dhawade

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज (२८ डिसेंबर) लोकपाल म्हणजे लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले.

Lokpal Bill : | Sarkarnama

लोकायुक्त विधेयक किंवा लोकपाल विधेयक हे भारतातील भ्रष्टाचारविरोधी प्रस्तावित कायदा आहे

Lokpal Bill : | Sarkarnama

केंद्रात लोकपाल मंजूर झालं तसाच कायदा महाराष्ट्रात झाला पाहिजे," अशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मागणी होती. 

Lokpal Bill | Sarkarnama

काही सार्वजनिक संस्थांविरुद्ध ठेवलेल्या भ्रष्टाचाराचा ठपका आणि त्यासंबंधित घटकांची चौकशी केली जाईल.

Lokpal Bill | Sarkarnama

भ्रष्टाचाराच्या तक्रारीसह सरकारमधील गैरकारभार आणि दप्तर दिरंगाई लोकायुक्तांच्या कक्षेत येतील.

Lokpal Bill | Sarkarnama

नव्या लोकायुक्त कायद्यात सर्व कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या चौकशीचे अधिकार आहेत.

Lokpal Bill | Sarkarnama

राज्यातील सर्व नगर परिषदा, पंचायत समित्या व जिल्हा परिषदा, महानगरपालिका, लोकायुक्ताच्या कक्षेत येतील.

Lokpal Bill | Sarkarnama

खोट्या तक्रारी होऊ नयेत म्हणून आणि खोटी तक्रार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे.

Lokpal Bill | Sarkarnama

लोकायुक्त कायदा हा माहिती अधिकार कायद्याच्या दोन पावले पुढे असणार आहे.

Lokpal Bill | Sarkarnama

माहिती अधिकारात माहिती घेता येते. पण लोकायुक्त कायद्यानुसार थेट चौकशी व कारवाई देखील करता येणार आहे

Lokpal Bill | Sarkarnama

लोकायुक्त कायद्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण होईल आणि लोकांना खऱ्या लोकशाहीचा अनुभव येईल.

Lokpal Bill | Sarkarnama