जातमुचलका म्हणजे काय? जाणुन घ्या कशी असते जामीनाची प्रक्रिया....

अनुराधा धावडे

सुरक्षा आणि बॉण्ड हा जामीनाशी संबंधित विषय आहे.

Bail Bond

कोणत्याही व्यक्तीची न्यायालयाकडून ठराविक अटीशर्तीवर तुरुंगातून सुटका केली जाते, यामध्ये आरोपीच्या वतीने महत्त्वपूर्ण जामीनपत्रे सादर केली जातात. जामीनदाराच्या वतीने आरोपीबद्दल हमी दिली जाते, यालाच कायद्याच्या भाषेत 'बेल बॉन्ड' म्हणतात.

Bail Bond

हमीदाराकडून जामीन दिला जातो, तर आरोपीच्या वतीने जातमुचलक सादर केले जाते

Bail Bond

विशेष परिस्थितीत, आरोपीला त्याच्या जातमुचलक्यावर सोडले जाते. फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 च्या कलम 440 ते 450 अंतर्गत जामीनदारांबाबत तरतूद करण्यात आली आहे.

Bail Bond

कलम 441 नुसार, जेव्हा एखाद्या आरोपीला जामिनासह किंवा त्याशिवाय जामीन बॉण्डवर सोडण्याचा आदेश दिला जातो आणि आदेशात काही अटीशर्ती घातल्या जातात, तेव्हा आरोपीला बाँड सादर करावा लागतो.

Bail Bond

जामीनपत्रातील या अटीशर्तीचे पालन करणे आरोपीसाठी बंधनकारक असते

Bail Bond

आरोपीने नमूद केलेल्या वेळी आणि ठिकाणी उपस्थित राहावे लागेल

Bail Bond

आरोपाचे उत्तर देण्यासाठी आवश्यकतेनुसार उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालय किंवा अन्य न्यायालयात उपस्थित राहते, किंवा

Bail Bond

जामीनातील इतर अटींशर्तीचे पालन करणे बंधनकारक असेल.

Bail Bond
CTC Image