लखीमपूर खीरीमध्ये नक्की काय घडले?

सरकारनामा ब्युरो

या घटनेत चार शेतकरी आणि चार भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतापलेल्या लोकांनी मंत्र्याच्या तीन वाहनांना आग लावली.

लखीमपूर खीरी

काल लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे आले होते.

लखीमपूर खीरी

त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा अभिषेक आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती.

तर, "माझ्यावरील सर्व आरोप निराधार आहेत. मी घटनास्थळी उपस्थित नव्हतो. काही समाजकंटकांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल होता. यात आमच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. असे स्पष्टीकरण आशिष मिश्रा यांनी दिले आहे.

लखीमपूर खीरी

तर, शेतकऱ्यांच्या हत्येनंतर लखीमपूर खेरीला निघलेल्या कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधींना ताब्यात घेण्यासाठी यूपी पोलीसांना मोठा ताफा तैनात केला होता.

लखीमपूर खीरी

मंत्री अजय मिश्रा यांचा दहा दिवसांपुर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता."सुधर जाओ वरना 2 मिनिट लगेंगे हमे..." अशी भाषा त्यांनी शेतकरी आंदोलकांबाबत वापरली होती.

लखीमपूर खीरी

मंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, त्यांच्या मुलावर हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून या घटनेची चौकशी करा अशा मागण्या शेतकरी आंदोलकांनी केल्यात.

लखीमपूर खीरी