Urfi Javed controversy: उर्फी जावेद आणि चित्रा वाघांचा ट्विटर वॉर; काय आहे प्रकरण?

सरकारमाना ब्यूरो

गेल्या काही दिवसापासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील ट्वीटर वॉर चांगलाच गाजत आहे.

Chitra Wagh | Sarkarnama

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला 'अटक' करा अशी मागणी केली आहे.

Urfi Javed | Sarkarnama

सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारचे चाळे आम्ही चालू देणार नाही, असा दम वाघ यांनी भरला आहे.

Chitra Wagh | Sarkarnama

चित्रा वाघ यांच्या ट्विटवर उर्फीने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. "आणखी एका राजकारण्याने दाखल केलेल्या तक्रारीने माझ्या नव्या वर्षाची सुरुवात झाली".

Urfi Javed | Sarkarnama

"अश्लीलता आणि न्युडिटीची संकल्पना ही त्या त्या व्यक्तीनुसार बदलते. माझ्या शरीराचा ठराविक भाग दिसत नसेल, तर तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकणार नाही. हे सर्व फक्त मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सुरू आहे’.

Urfi Javed | Sarkarnama

राजकारण्यांकडे काही काम नाही का? मला तुरूंगात पाठवला येईल असे एकही कलम राज्यघटनेत नाही.

Urfi Javed | Sarkarnama

"मानवी तस्करी आणि सेक्स ट्रॅफिकिंग यांसारख्या घटना अजूनही मुंबईत घडत आहेत, त्याबद्दल तुम्ही काहीतरी करण्याचा विचार करा. अनधिकृत डान्स बार बंद करा, ज्या अजूनही चालू आहेत",

Urfi Javed | Sarkarnama

उर्फी एवढीच पोस्ट करून थांबली नाही तर, "जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे."  

Urfi Javed | Sarkarnama

तिच्या ट्विटला उत्तर देत चित्रा वाघ म्हणाल्या "मला ज्या दिवशी ती हातात सापडेल त्या दिवशी पहिल्यांदा धोबडवेल आणि नंतर ट्विट करून सांगेल मी काय केलंय ते".

Chitra Wagh | Sarkarnama