Sunil Dhumal
द्वेषपूर्ण भाष्य केल्याने सपाचे नेते आझम खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली.
सपाचे नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यालाही एका गुन्ह्यात शिक्षा झाल्याने आमदारकी गमवावी लागली.
गाजीपूरचे बसपा खासदार, गँगस्टर अफजल अन्सारी यांस चार वर्षांची शिक्षा झाल्याने लोकसभा सदस्यत्व गमवावे लागले.
दंगल प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झाल्याने भाजपचे विक्रम सैनी यांना विधानसभेचे सदस्यत्व गमवावे लागले.
हमीरपूरचे अशोककुमार सिंह चंदेल यांना खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. परिणामी त्यांना आमदारकी गमवावी लागली.
बलात्कार आणि खून प्रकरणी दहा वर्षांची शिक्षा झालेले भाजपचे कुलदीप सिंह सेंगर यांची आमदारकी रद्द झाली.
बनावट गुणपत्रिका प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झाल्याने गोसाईगंज (अयोध्या) भाजपचे इंद्र प्रताप तिवारी उर्फ खब्बू तिवारी यांची आमदारकी रद्द झाली.