Raosaheb Danve Social Work: रावसाहेब दानवेंचा आजपर्यंत कधीही न पाहिलेला लूक... पाहा खास फोटो...

Deepak Kulkarni

चर्चेतलं व्यक्तिमत्व

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे नेहमी चर्चेत असतात.

Raosaheb Danve | Sarkarnama

साधं राहणीमान

ग्रामीण व हटके भाषाशैली, साधं राहणीमान यामुळे ते राज्यातच नाहीतर दिल्लीदरबारीही ओळखले जातात.

Raosaheb Danve | Sarkarnama

राजकीय प्रवास....

दानवेंचा राजकीय जीवनातला प्रवेश त्यांच्या ग्रामपंचायतीपासून झाला.

Raosaheb Danve | Sarkarnama

विधानसभा - लोकसभा...

त्यांनी १९९० व १९९५ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून आले. नंतर १९९९, २००४ व २००९, २०१४ आमि २०१९ अशा पाचवेळा भाजपच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले.

Raosaheb Danve | Sarkarnama

वेगळाच लूक

रोज हिरवा झेंडा दाखवून आणि फीत कापून विविध विकासकामांचे उद्घाटन करणाऱ्या दानवेंचा आजमात्र वेगळाच लूक पाहायला मिळाला.

Raosaheb Danve | Sarkarnama

हातात कुऱ्हाड

त्यांनी हातात चक्क कुऱ्हाड घेतलेली पाहायला मिळाली.

Raosaheb Danve | Sarkarnama

गाठलं गाडगेबाबा जलाशय

दानवे यांनी हातात कुऱ्हाड घेवून थेट जालन्यातील घाणेवाडी (ता.जालना) येथील संत गाडगेबाबा जलाशय गाठले.

Raosaheb Danve | Sarkarnama

कुऱ्हाडीचा घाव

यावेळी जलाशयाच्या भिंतीवरील वाढलेली गवत, काटेरी झुडपे कुऱ्हाडीने तोडली.

Raosaheb Danve | Sarkarnama

श्रमदानात दानवेंची एन्ट्री

या प्रकल्पाची भिंत स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून काम सुरू असून, त्यानिमित्ताने श्रमदान मोहिमेत रविवारी दानवेंनी सहभाग नोंदवला.

Raosaheb Danve | Sarkarnama

मोठ्या प्रमाणात श्रमदान

जलाशयाच्या परिसरात प्लास्टिक कचरा देखील मोठ्याप्रमाणावर जमा झाला. त्यामुळे या प्रकल्पाची भिंत स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करण्यात आला.

Raosaheb Danve | Sarkarnama

लोकसहभागातून स्वच्छता मोहीम

प्रत्येक रविवारी लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवली जाते.

Raosaheb Danve | Sarkarnama

दानवेंच्या साधेपणाची जोरदार चर्चा

केंद्रीय मंत्री असताना देखील दानवे श्रमदान मोहिमेत दाखल झाल्याने पुन्हा एकदा त्यांचा साधेपणा पाहायला मिळाला असून त्याची जोरदार चर्चा देखील पाहायला मिळत आहे.

Raosaheb Danve | Sarkarnama

राजकारणाची उत्तम जाण

ग्रामीण भागातील राजकारणाची उत्तम जाण आणि त्यावर पकड असणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये रावसाहेब दानवे यांचे नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल.

Raosaheb Danve | Sarkarnama

NEXT : चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात? श्रीजया चव्हाणांचे भावी आमदार म्हणून होर्डिंग झळकले!