Maharashtra IAS Transfer : राज्यातील '10' बड्या 'आयएएस' अधिकाऱ्यांच्या बदल्या ; तुकाराम मुंडेंकडे या खात्याची जबाबदारी

Rashmi Mane

1. डॉ. नितीन करीर

1998 च्या बॅचचे 'आयएएस' अधिकारी डॉ. नितीन करीर हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महसूल, नोंदणी आणि मुद्रांक, महसूल आणि वन विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Dr.Nitin Kareer | Sarkarnama

2. मिलिंद म्हैसकर

1992 च्या बॅचचे अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Milind Mhaiskar | Sarkarnama

3. डी.टी.वाघमारे

1994 च्या बॅचचे अधिकारी डी.टी.वाघमारे यांची गृहविभागाच्या PS (A&S) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. 

D.T.Waghmare | Sarkarnama

4. राधिका रस्तोगी

1995 च्या अधिकारी राधिका रस्तोगी यांची अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

Radhika Rastogi | Sarkarnama

5. डॉ. संजीव कुमार 

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची महापारेषण विभाागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

Dr.Sanjeev Kumar, | Sarkarnama

6.श्रावण हर्डीकर

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून 2005 च्या बॅचचे 'आयएएस' अधिकारी श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. 

Shravan Hardikar | Sarkarnama

7. तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे यांना,पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

Tukaram Munde | Sarkarnama

8. जी. श्रीकांत

2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी जी. श्रीकांत हे आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असणार आहेत. त्यांच्याकडे सध्या राज्य कर विभागाचे छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून जबाबदारी आहे.

G.Sreekanth | Sarkarnama

9. डॉ. अभिजित चौधरी

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असलेले डॉ. अभिजित चौधरी यांची राज्य कर विभागात छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Dr.Abhijeet Chaudhari | Sarkarnama

10.पी. शिव शंकर

पी. शिव शंकर यांची श्री साईबाबा संस्थान ट्र्स्ट, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे नागपूर टेक्सटाईल विभागाचे संचालक म्हणून जबाबदारी आहे. 

P.Siva Sankar | Sarkarnama

Next: शरद पवार यांच्या कर्तबगार लेकीची; अशी आहे राजकीय कारकीर्द!