Karnataka MLA Photo's : सर्वाधिक मतांनी निवडून आलेले कर्नाटकचे टॉप दहा आमदार; पाहा फोटो!

Chetan Zadpe

आर अशोका (भाजप) :

कर्नाटकच्या पद्मनभा नगर या मतदारसंघाचे भाजप उमेदवार आर अशोका यांना 98750 मते मिळाली. तर काँग्रेस उमेदवार वी रघुनाथ नायडू यांना 43440 मते मिळाली. आर अशोका यांना  55,175 इतके मताधिक्य मिळाले.

R. Ashoka | Sarkarnama

लक्ष्मी आर. हेब्बळकर (काँग्रेस) :

बेळगाव ग्रामीण या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी आर. हेब्बळकर या 56016 मताधिक्यांनी निवडून आल्यात. हेब्बळकर यांना 107619 मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागेश मनोलकर यांना 51603 मते मिळाली.

Laxmi R. Hebbalkar | Sarkarnama

सतीश जारकीहोली (काँग्रेस ) :

येमकनमर्डी या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोली हे 57211 मताधिक्याने विजयी झाले. जारकीहोली यांना 100290 मते मिळाली. तर भाजप उमेदवार बसवराज हुंड्री यांना 43079 मते मिळाली.

Satish Laxmanarao Jarkiholi | Sarkarnama

ए. आर. कृष्णमूर्ती (काँग्रेस) :

कोल्लेगल या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार ए. आर. कृष्णमूर्ती यांनी 57,211 मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. कृष्णमूर्ती यांना 108363 मते मिळाली तर भाजप उमेदवार यांना एन महेश यांना 48844 मते मिळाली.

A.R. Krishnamurthy | Sarkarnama

ए. सी. श्रीनिवासा (काँग्रेस) :

पुलकेशीनगर या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार ए. सी. श्रीनिवासा यांनी 62210 मताधिक्याने विजय मिळवला आहे. श्रीनिवासा यांना 87316 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी बसपा उमेदवार अखंडा श्रीनावासा मूर्ती यांना 25106 इतकी मते मिळाली.

A C Srinivasa | Sarkarnama

एस आर विश्वनाथ (भाजप) :

येलायंका या मतदारसंघातून भाजप उमेदवार एस आर विश्वनाथ यांनी 64,110 इतक्या मताधिक्याने विजय संपादन केले. विश्वनाथ यांना 141538 मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवार केशवा रजन्ना यांना 77428 मते मिळाली.

S R Vishwanath | Sarkarnama

भालचंद्र लक्ष्मणराव जारकीहोळी (भाजप) :

अराभावी या मतदारसंघातून भाजपचे भालचंद्र लक्ष्मणराव जारकीहोळी यांनी 71,540 मताधिक्यांनी विजयी झाले जारकीहोळी यांना 115402 मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार भिमाप्पा गदग यांना 43862 मते मिळाली. तर इथे काँग्रेसला 23956 मते मिळाली.

Balachandra Laxmanrao Jarkiholi | Sarkarnama

लक्ष्मण सवदी (काँग्रेस) :

अथनी या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार लक्ष्मण सवदी यांनी 76,122 मताधिक्यांनी विजयी झाले. सवदी यांना 131404 मते मिळाली. तर भाजप उमेदवार महेश कुमथल्ली यांना 55282 मते मिळाली.

Laxman savdi | Sarkarnama

गणेश हुक्केरी (काँग्रेस) :

चिकोडी सदल्गा या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार गणेश हुक्केरी 78,509 मताधिक्याने विजयी झाले. हुक्केरी यांना 128349 मते मिळाली तर भाजप उमेदवार विश्वनाथ कट्टी यांना 49840 मते मिळाली.

Ganesh prakash hukkeri | Sarkarnama

डी के शिवकुमार (काँग्रेस) :

काँग्रेसचे दिग्गज नेते डि के शिवकुमार यांनी कनकपुरा या मतदारसंघातून तब्बल 1,22,392 विक्रमी मताधिक्यांनी विजय मिळवला. शिवकुमार यांना 143023 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे आर अशोका यांना केवळ19753 मते मिळाली.

D K Shivkumar | Sarkarnama

अशोक चव्हाणांच्या भाचीचा कर्नाटकच्या निवडणुकीत पराभव; कोण आहेत डॉ.अंजली निंबाळकर?

Web Story | Sarkarnama