महात्मा गांधींची 'ती' आंदोलने ज्यांनी देशाचे चित्रच बदलून टाकले

अनुराधा धावडे

गांधीजींच्या नेतृत्वात 1917 मध्ये बिहारच्या चंपारण जिल्ह्यात सत्याग्रह झाला. गांधींजींच्या नेतृत्त्वात भारतातील ही पहिली सत्याग्रह चळवळ होती. हे आंदोलन नीळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात होते. हे आंदोलन खूप यशस्वी झाले.

चंपारण्य आंदोलन

गुजरातमधील खेडा गाव पुरामुळे उध्वस्त झाले होते, येथील शेतकऱ्यांचे कर माफ करण्यासाठी गांधीजींनी खेडा आंदोलन केले. गांधींजींच्या या आंदोलनामुळे ब्रिटीश सरकारला शेतकऱ्यांना करमाफी करावी लागली.

खेडा आंदोलन

स्वातंत्र्य चळवळीचा आवाज दाबून टाकण्यासाठी 1919 मध्ये इंग्रजांनी रॉलेट कायदा आणला होता. त्याला 'काळा कायदा' असेही म्हणतात. पण गांधींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाने या विरोधात आवाज उठवला.

रॉलेट अॅक्ट

ब्रिटिश राजवटीत योग्य न्याय मिळणे अशक्य आहे, म्हणून महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारकडून राष्ट्राचे सहकार्य काढून घेण्याची योजना आखली, ज्याला 'असहकार आंदोलन' असे नाव देण्यात आले. या चळवळीने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत नवसंजीवनी दिली.

असहकार आंदोलन

मिठाच्या सत्याग्रहाला दांडी सत्याग्रह असेही म्हणतात. 1930 मध्ये ब्रिटीश सरकारने मिठावर कर लावला तेव्हा महात्मा गांधींनी या कायद्याविरोधात आंदोलन सुरू केले.

मीठाचा सत्याग्रह

देशात अस्पृश्यता पसरल्याच्या निषेधार्थ महात्मा गांधींनी 8 मे 1933 पासून अस्पृश्यताविरोधी चळवळ सुरू केली.

दलित आंदोलन

महात्मा गांधींनी 1942 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) मुंबई अधिवेशनात भारत छोडो आंदोलन सुरू केले. या चळवळीमुळे इंग्रजांना भारत सोडावा लागला. या चळवळीनंतरच देशात स्वातंत्र्याचा पाया रचला गेला.

भारत छोडो आंदोलन

गांधींच्या चळवळींनी सामान्य जनतेमध्ये काँग्रेसबद्दल विश्वास निर्माण केला. काँग्रेसने सुरू केलेल्या चळवळी त्यांना गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त करू शकतात, हे लोकांना कळू लागले.

Mahatma Gandhi Jayanti