Parth Pawar Birthday : पार्थ पवारांची अशी सुरू झाली राजकीय वाटचाल

सरकारनामा ब्युरो

पार्थ आणि रोहित पवार यांच्या रुपाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. आज पार्थ पवारांचा वाढदिवस आहे.

Parth Pawar | Sarkarnama

मुंबईच्या एचआर महाविद्यालयातून कॉमर्सची पदवी घेतल्यानंतर पार्थ पवार यांनी लंडनमधील विद्यापीठातून वकिलीची पदवी घेतली. सध्या ते कौटुंबिक व्यवसाय सांभाळतात.

Parth Pawar | Sarkarnama

पार्थ हे उत्कृष्ट क्रीडापटू असून त्यांनी अॅथलेटिक्समध्ये विविध पुरस्कार मिळविलेत. फुटबॉल, टेनिस खेळणे हे त्यांचे छंद आहेत.

Parth Pawar | Sarkarnama

२०१४ मध्ये वयाच्या २४ वर्षी मामा पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेऊन पार्थ यांनी राजकीय वाटचालीची चुणूक दाखविली.

Parth Pawar | Sarkarnama

पार्थ यांनी २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

Parth Pawar | Sarkarnama

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतल्याने पार्थ पवार राष्ट्रवादीवर नाराज असल्याची चर्चा झाली होती.

Parth Pawar | Sarkarnama

आयकर विभागाने पार्थ पवार यांच्या मुंबई येथील कार्यालयावर धाड टाकली होती.

Parth Pawar | Sarkarnama

राममंदिराचे स्वागत आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणीबद्दल पार्थ पवार यांच्यावर पक्षातूनच टीका झाली.

Parth Pawar | Sarkarnama

पार्थ पवार २०२४ च्या लोकसभेतून 'श्रीगणेशा' करणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Parth Pawar | Sarkarnama

NEXT : जपानच्या पंतप्रधानांची मोदींसोबत 'पाणीपुरी पे चर्चा', पाहा फोटो!