Bollywood Star's in Politics : बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टार्सनी घेतली होती राजकारणात एन्ट्री..

सरकारनामा ब्यूरो

शत्रुघ्न सिन्हा यांनी १९९६ मध्ये भाजप तर्फे पहिल्यांदा निवडणूक जिंकली. २००३ आणि २००४ मध्ये ते आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्री होते. त्यांनी आसनसोलमधून लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लढवली. ते 'टीएमसी'तर्फे लढवलेल्या निवडणुकीत विजयी झाले.

Shatrughan Sinha | Sarkarnama

माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी अमिताभ बच्चन यांना राजकारणात आणलं. अमिताभ यांनी १९८४ मध्ये अलाहाबाद (प्रयागराज) मधून निवडणूक लढले होते. त्यांनी या सीटवरून दिग्गज नेते हेमवंती नंदन बहुगुणा यांना हरवले होते. मात्र, बोफोर्स घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांना खासदार पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ते कधीच राजकारणात सक्रीय झाले नाहीत.

Amitabh Bachchan | Sarkarnama

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत यांचा तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय सहभाग राहिला आहे. रजनीकांत यांनी 12 जुलै 2021 रोजी त्यांचा पक्ष रजनी मक्कल मंद्रम (RMM) पक्ष स्थापना केली होती. पण काही वर्षा पूर्वी त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

Rajnikath | Sarkarnama

धर्मेंद्र यांनी देखील राजकारणात स्वतःला आजमावलं आहे. 2004 मध्ये, त्यांनी भाजपच्या तिकिटावर राजस्थानमधील बिकानेरमधून लोकसभा निवडणूक जिंकली आणि 2009 पर्यंत ते खासदार होते. यानंतर त्यांनी राजकारणाचा निरोप घेतला.

Dharmendra | Sarkarnama

डान्सिंगचा बादशहा अशी ओळख असलेल्या गोविंदाही राजकारणात सक्रीय होता. त्याने २००४ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्याने भाजपचे राम नाईक यांना ५० हजार मतांनी हरवले होते. २००८ मध्ये त्याने राजीनामा दिला.

Govind Arun Ahuja | Sarkarnama

तेलुगू चित्रपट मेगास्टार के चिरंजीवी यांनी 2008 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये 'प्रजा राज्यम पार्टी' हा राजकीय पक्ष सुरू केला होता. त्यानंतर काही महिन्यातच या पक्षाचे विलिनीकरण काँग्रेसमध्ये करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री (पर्यटन मंत्रालय) म्हणून पदभार स्विकारला होता.

Chiranjeevi | Sarkarnama

सनी देओल यांनी 23 एप्रिल 2019 रोजी भारतीय जनता पक्षमध्ये प्रवेश केला. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गुरुदासपूर मतदारसंघातून काँग्रेसचे त्यांचे प्रतिस्पर्धी सुनील जाखड यांच्या विरोधात 82,459 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

Sunny Deol | Sarkarnama

2009 मध्ये, मनोज तिवारी यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून भाग घेतला. पण त्यांचा पराभव झाला. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत, मनोज तिवारी यांनी ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजप तर्फे निवडणूक जिंकली.

Manoj TIwari | Sarkarnama