Anuradha Dhawade
न्यायमूर्ती अशोक भूषण जुलै 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर चार महिन्यांनी केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाचे (एनसीएलएटी) अध्यक्षपद दिले.
न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी निवृत्तीनंतर कोणतेही अधिकृत सार्वजनिक पद स्वीकारले नाही. ते नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठात कार्यरत आहेत.
अयोध्या खटल्यावर निकाल देणाऱ्या खंडपीठाचा भाग असलेले न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड हे सध्या भारताचे सरन्यायाधीश आहेत. त्यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये भारताचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर जानेवारी २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर अवघ्या एक महिन्यानंतर त्यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निवृत्तीनंतर चार महिन्यांनी न्यायमुर्ती रंजन गोगोई यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित केले होते.