Maharashtra Bhushan: महाराष्ट्रभूषण पुरस्काराचे मानकरी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे असे आहे कार्य

Rashmi Mane

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरुपणकार पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२ चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देण्यात आला आहे.

Appasaheb Dharmadhikari | Sarkarnama

२००८ साली त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनाही मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता.

Nanasaheb Dharmadhikari | Sarkarnama

डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले ३० वर्ष निरुपण करत असून अंधश्रद्धा निर्मुलानसाठी काम करतानाच त्यांनी अगदी आदिवासी वाडी, वस्त्यांवर जाऊन व्यसनमुक्तीचे काम केलं आहे.

Appasaheb Dharmadhikari | Sarkarnama

2017 मध्ये आप्पासाहेबांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Appasaheb Dharmadhikari | Sarkarnama

धर्माधिकारी यांचे मूळ आडनाव 'शांडिल्य'. त्यांच्या पूर्वजांनी म्हणजे गोविंद चिंतामण शांडिल्य यांनी धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने केले आणि म्हणून कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी' अशी पदवी दिली. तेव्हापासून ते धर्मधिकारी आडनाव लावतात.

Appasaheb Dharmadhikari | Sarkarnama

नानासाहेबांनी रेवदंडा येथील श्रीसमर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीच्या माध्यमातून जगभरात अध्यात्माचा प्रसार केला. त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहेत. नानासाहेबांनंतर त्यांचे पुत्र म्हणजे अप्पासाहेबांनी त्यांचे काम तसेच पुढे चालू ठेवले.

Appasaheb Dharmadhikari | Sarkarnama

नानासाहेबांनी 1943 पाासून या कार्याची सुरुवात केली. श्रवण बैठकांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं कार्य धर्माधिकारी कुटूंब करत आहेत.

Appasaheb Dharmadhikari | Sarkarnama