Anuradha Dhawade
देशभरातील २८ विरोधी पक्षांच्या 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' अर्थात I.N.D.I.A.आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईत सुरू आहे
मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये 28 पक्षांचे नेते एकत्र आले आहेत आहे. पाटणा, बंगळुरुनंतर I.N.D.I.A आघाडीची ही तिसरी बैठक आहे.
विशेष म्हणजे, इंडिया आघाडीच्या बैठकीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात दुरावलेले पक्ष भाजपच्या विरोधात पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी सज्ज झाले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि डी. राजा यांचीशी भेटीगाठी करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली.
मुंबईत सुरू असलेल्या या बैठकीचे उद्धव ठाकरे हे निमंत्रक आहेत.
या बैठकीच्या निमित्ताने अनेक वर्षांनी राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी पुन्हा एकत्रितरित्या पाहायला मिळाले.
राहुल गांधी माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशीही गप्पागोष्टी करताना दिसले.
इंडिया बैठकीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी डी. राजा (दोरीसामी राजा) यांच्याशीही भेटीगाठी हसतखेळत गप्पागोष्टी करता दिसले.