Happy Birthday Raj Thackeray म्हणून तरुणांच्या हृदयावर राज्य करतात राज ठाकरे

सरकारनामा ब्युरो

२००८ मध्ये महाराष्ट्रात येणाऱ्या उत्तर भारतीय व बिहारी लोकांवर राज ठाकरेंनी टीका केली. तिकडच्या राजकारण्यांमुळे त्या राज्यांमध्ये रोजगार निर्माण होत नाही.

Happy Birthday Raj Thackeray

त्या राज्यांच्या नाकर्तेपणाचा भुर्दंड महाराष्ट्राच्या जनतेने का भ‍रावा? असा सवाल करत तेथील राजकारण्यांवर टीका केली होती.

Raj Thackeray Birthday

- जुलै २००८ मध्ये राज ठाकरेंनी मुंबईसह राज्यभरातील दुकांनांवर मराठी पाट्या लावण्याचा इशारा दिला. पण इशारा देऊनही दुकानदारांनी पाट्या बदलल्या नाही.

Raj Thackeray news

Happy Birthday त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी हडताळ चालू केल्यानंतर अनेक दुकान मालकांनी दुकानांच्या पाट्या मराठीत केल्या.

Raj Thackeray Happy Birthday news

फक्त इंग्रजी व हिंदी भाषेत ग्राहकांना सेवा देण्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील टेलिकॉम कंपन्याही इशारा दिला. त्यानंतर राज्यात सर्व टेलिकॉम कंपन्यांनी मराठीतही सेवा देण्यास सुरूवात करावी.

MNS Raj Thackeray

भारतातील सर्वात सुंदर असा विकासाचा आराखडा निर्माण करण्याचे कामही राज ठाकरे यांच्याच नावावर आहे. त्यांच्या महाराष्ट्राच्या ब्लु प्रिंटमधील अनेक निर्णय आज मोदी सरकारने आस्तित्वात आणले आणि त्यावर कामही सुरु केले आहे.

Raj Thackeray Birthday

एकदा जेट एअरवेजमधून अनेक मराठी कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले. तेव्हा हे सगळे कामगार राज ठाकरेंकडे आले. त्यावेळीही राज ठाकरेंनी पुन्हा त्या कामगारांना कामावर रुजू करून घ्यायला लावले.

Raj Thackeray Birthday news

रेल्वेभरतीत मराठी मुलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २००८ साली एक मोठं आंदोलन उभारलं होतं. त् रेल्वे भरतीप्रकरणी राज ठाकरेंनी केलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्र रेल्वेत अनेक मराठी तरुणांना नोकरी मिळाली.

Raj Thackeray

अलीकडेच त्यांनी एका भाषणात मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरुन मोठा गदारोळही झाला. पण अखेर राज्यभरातील अनधिकृत हजारो मशिदींवरील लाऊडस्पीकर काढून टाकण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raj Thackeray