PM Presented Budget : इतिहासातील 'ते' खास क्षण, ज्यावेळी पंतप्रधानांनी सादर केले होते अर्थसंकल्प

अनुराधा धावडे

देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की भारताच्या इतिहास असेही काही क्षण आहेत ज्यावेळी पंतप्रधांनानी अर्थसंकल्प सादर केला आहे.

Pandit Jawaharlal Nehru

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी पंतप्रधान पदावर असताना १३ फेब्रुवारी १९५८ रोजी अर्थसंकल्प सादर केला होता.

Pandit Jawaharlal Nehru

तत्कालीन अर्थमंत्री टी .टी कृष्णाचारी यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे जवाहरलाल नेहरु यांना अर्थसंकल्प सादर करावा लागला होता.

T.T. Krushnachari

मोरारजी देसाई यांनी 1977 ते 1979 या काळात पंतप्रधानपद भूषवले. 10 अर्थसंकल्प (8 वार्षिक आणि 2 अंतरिम) सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

Former PM Morarji Desai

मोरारजी देसाईंनी 1959-60 ते 1963-64 आणि पुन्हा 1967-68 ते 1969-70 या काळात अर्थसंकल्प सादर केला. 1962-63 आणि 1967-68 या आर्थिक वर्षाचा वार्षिक अर्थसंकल्पही त्यांनीच सादर केला

Former PM Morarji Desai

मोरारजी देसाई यांनी 1969 मध्ये इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर इंदिरा गांधींनी 1970 मध्ये अर्थसंकल्प सादर केला.

Former PM Indira Gandhi

इंदिरा गांधी या पहिल्या महिला अर्थमंत्री होत्या. जवळपास एक वर्षभर त्यांनी अर्थमंत्रालयाचा कारभार सांभाळला.

Former PM Indira Gandhi

राजीव गांधी : जानेवारी ते जुलै 1987 या काळात राजीव गांधी यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार होता. या काळात त्यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला

Former PM Rajiv Gandhi

राजीव गांधी यांनी तत्कालीन अर्थमंत्री व्ही.पी सिंह यांना पदावरून हटवल्यामुळे अर्थमंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडेच होती.

Former PM Rajiv Gandhi

मनमोहन सिंग : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह 2004 ते 2014 या काळात देशाचे पंतप्रधान होते. तर 1991 ते 1996 या काळात त्यांच्याकडे अर्थमंत्री पदाची सुत्रे होती.

Former PM Manmohan Singh

मनमोहन सिंग यांनी 1991 च्या अर्थसंकल्पात उदारीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले. 1994 मध्ये त्यांनी सेवाकर आणला.

Former PM Manmohan Singh