तामिळनाडूतील सरकारी शाळांमध्ये Free Breakfast Scheme

सरकारनामा ब्युरो

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी गुरुवारी येथील सरकारी शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत नाश्ता योजना सुरू केली.

यावेळी सीएम स्टॅलिन यांनी शाळेतील मुलांना जेवण वाढले आणि त्यांच्यासोबत बसून जेवणही केले.

या योजनेंतर्गत एकूण 33.56 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

या योजनेचा राज्यभरातील 1,14,095 विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

राज्यातील 1,545 शाळांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.

या प्रकारच्या योजनेत एका मुलासाठी दररोज 12.75 रुपये खर्च येतो.

चेन्नईतील सरकारी शाळांच्या पाहणीदरम्यान अनेक विद्यार्थी नाश्ता न करताच शाळेत येत असल्याचे निदर्शनास आले होते

या पाहणीनंतर त्यांनी तामिळनाडूतील सरकारी शाळांमध्ये ब्रेकफास्ट योजना सुरु केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून मोफत नाश्ता योजना राबविण्यात येणार आहे.