या 'दहा' अभिनेत्री आहेत राजकारणात सक्रिय, पाहा फोटो!

सरकारमाना ब्यूरो

हेमा मालिनी 2004 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणाच्या रिंगणात उतरल्या. सध्या त्या उत्तर प्रदेश मधील मथुरा मतदारसंघाच्या खासदार आहेत.

Hema Malini | Sarkarnama

जया बच्चन यांनी समाजवादी पक्षाच्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवले.

Jaya Bachchan | Sarkarnama

किरण खेर भाजपच्या चंडीगड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2009 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.

Kirron Kher | Sarkarnama

स्मृती ईराणी यांचा टेलिव्हिजन अभिनेत्री ते महिला आणि बाल विकास मंत्रालयांचा मंत्री असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे.

Smriti Irani | Sarkarnama

जया प्रदा यांनी 2004 मध्ये समाजवादी पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला.

Jaya Prada | Sarkarnama

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Urmila Matondkar | Sarkarnama

मिमी चक्रवर्ती बंगाली अभिनेत्री आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षातून २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या.

Mimi Chakraborty | Sarkarnama

नुसरत जहाँ बंगाली अभिनेत्री आणि राजकारणी आहेत. त्यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि बशीरहाट मतदारसंघातून 2019 ची लोकसभा जिंकली.

Nusrat Jahan | Sarkarnama

रम्या उर्फ दिव्या स्पंदना या दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत. त्यांनी २०१२ मध्ये युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१३ मध्ये कर्नाटकातील मंड्या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर पोटनिवडणूक जिंकली.

Ramya aka Divya Spandana | Sarkarnama