Sushma Andhare: 'कणखर लढावू बाणा गळून पडलाय...' सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट व्हायरल

सरकारनामा ब्यूरो

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकाच आवाजाचा बोलबाला आहे, तो आवाज म्हणजे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे.

Sushma Andhare | Sarkarnama

ठाकरे गटाच्या 'फायर ब्रँड' नेत्या भाषणाला उठल्या की भल्याभल्यांचे धाबे दणाणतात. 

Sushma Andhare | Sarkarnama

दसरा मेळाव्यातील भाषणातून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या अंधारे या शिवसेनेची (ठाकरे गट) धडाडणारी तोफ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

Sushma Andhare | Sarkarnama

सुषमा अंधारे या त्यांच्या कर्तव्याला कधीच चुकलेल्या नाहीत...पण...

Sushma Andhare | Sarkarnama

परिस्थितीपुढे हतबल झाल्या आहेत. कारण, लेकिपासून दूर असण्याची जाणीव त्यांच्याही पोटात खड्डा करून जाते. 

Sushma Andhare with daughter | Sarkarnama

चिमुकलीसाठी वेळ काढण्यासाठी अंधारेंना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Sushma Andhare with daughter | Sarkarnama

सध्या अंधारे यांची फेसबुक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. ही पोस्ट राजकारणाशी संबंधित नाही, तर ही पोस्ट आहे एका आईला लेकिकडे जाण्यासाठी असलेल्या आतुरतेची.

Sushma Andhare with daughter | Sarkarnama

मुलीचा वाढदिवस असताना देखील, आपण कर्तव्याला प्राधान्य देत तिच्यापासून दूर असल्याचं म्हणत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

Sushma Andhare | Sarkarnama