सरकारनामा ब्यूरो
25 डिसेंबर 1924 मध्ये ग्वाल्हेरच्या एका शिक्षकाच्या घरात अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला.
1942 साली भारत छोडो आंदोलनावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी राजकारणात प्रवेश केला.
1957 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी पहिल्यांदा बलरामपुरातून निवडणूक लढवली.
अटलबिहारी वाजपेयी 16 मे 1996 ला पहिल्यांदा पंतप्रधान झाले. 19 मार्च 1998 ला पुन्हा पंतप्रधान झाले. त्यानंतर 13 ऑक्टोबर 1999 ला ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले.
16 ऑगस्ट 2018 ला अटलबिहारी बाजपेयी यांच निधन झालं. तेव्हा सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच राजकारणातलं स्थान मोठं होतं. भाजपला उभारी देण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे.