Sonia Gandhi's Birthday : पहिल्याच भेटीत सोनियांनी जिंकलं राजीव गांधींचं हृदय...

सरकारमाना ब्यूरो

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज वाढदिवस. आज त्या 76 वर्षाच्या झाल्या आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

Sonia Gandhi | Sarkarnama

सोनिया गांधी यांचं मूळ नाव ॲन्टोनीया माईनो असून त्यांचा जन्म 9 डिसेंबर 1946 ला इटलीमध्ये झाला.

Sonia Gandhi | Sarkarnama

सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांची लव्ह स्टोरी खूप रंजक आहे. राजीव गांधी शिक्षणासाठी लंडनमध्ये असताना आपल्या मित्रांसोबत फिरायला जायचे. 1956 मध्ये राजीव गांधी एका हॉटेलमध्ये गेले असता त्यांना सोनिया गांधी दिसल्या आणि ते प्रेमात पडले.

Sonia Gandhi, Rajiv Gandhi | Sarkarnama

25 फेब्रुवारी 1968 ला 1 सफदरगंज रोडच्या लॉनवर दोघं विवाहबंधनात अडकले.

Sonia Gandhi, Rajiv Gandhi | Sarkarnama

आर्यन लेडी म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या इंदिरा गांधी आणि देशातील प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक असलेल्या गांधी कुटुंबाच्या त्या सूनबाई झाल्या.

Sonia Gandhi, Rajiv Gandhi, Indira Gandhi | Sarkarnama

भारतीय परंपरेनुसार, लग्नाआधी सोनिया राजीव यांच्या घरी राहू शकत नव्हत्या. त्यावेळी राजीव यांचे मित्र अभिनेते अमिताभ बच्चन मदतीला धावून आले. अमिताभ यांचे वडील कवी हरिवंशराय बच्चन यांनी सोनिया गांधींचे कन्यादान केले.

Sonia Gandhi, Rajiv Gandhi | Sarkarnama

प्रियंका, राहुल आणि पती राजीव गांधी यांच्या समवेत सोनिया गांधी.

Sonia Gandhi, Rajiv Gandhi | Sarkarnama

राजीव गांधींच्या हत्येनंतर त्यांना नाइलाजाने राजकारणात सक्रीय व्हावे लागले. २७ एप्रिल १९८३ मध्ये त्यांनी इटलीच्या नागरिकत्वाचा त्याग केला.

Sonia Gandhi, | Sarkarnama

१९९८ मध्ये सोनिया यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दोन दशक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणाऱ्या त्या एकमेव नेत्या आहेत.

Sonia Gandhi | Sarkarnama
CTC image | Sarkarnama