Rashmi Mane
गेल्या दोन- तीन दिवसात देशभरात शरद पवार हे नाव तुफान चर्चेत आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळेस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानक पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याच जाहीर केले आणि देशभरात खळबळ उडाली.
आज ( 5 मे ) ला राजीनामा मागे घेण्याचा निर्णय जाहीर करतांना शरद पवारांच्या मागे बसलेली तरुणी कोण? असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल?
पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या गर्दीमध्ये लक्ष वेधून घेतलं ते पिवळ्या रंगाचा कुर्ता घालून पवारांच्या मागे बसलेल्या महिलेने.
या महिलेचे नाव आहे 'सोनिया दूहन'.
'सोनिया दूहन' या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'पदाधिकारी' आहेत. त्या सध्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची 'राष्ट्रीय अध्यक्षा' म्हणून कार्यरत आहेत.
वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दिल्ली विद्यापीठात दोन निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीचं नेतृत्त्व केलं.
राष्ट्रीय महासचिव, पक्षाच्या युवक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.