म्हणून, आनंद दिघेंनी शिवसेना नगरसेवकाच्याच कानशिलात लगावली

अनुराधा धावडे

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेसह मुंबईच्या राजकारणातही आनंद दिघे यांचा दबदबा होता. 27 जानेवारी 1952 रोजी मुंबईत आनंद दिघे झाला.

Anand Dighe| Shivsena

“बाळासाहेबांच्या वक्तृत्व आणि व्यक्तिमत्त्वाने भारावून गेलेल्या आनंद दिघे यांनी आयुष्यभर शिवसेनेसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. 70 च्या दशकात त्यांनी शिवसेना कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

Anand Dighe| Shivsena

ठाण्यासारख्या जिल्ह्यात शिवसेनेला आनंद दिघे यांच्यासारखा पूर्णवेळ कार्यकर्ता मिळाला. दिघे यांची मेहनत पाहून बाळासाहेबांनी त्यांना ठाणे जिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली.

Anand Dighe| Shivsena

शिवसेना पक्षाचे सदस्य श्रीधर खोपकर यांच्या हत्येच्या आरोपाखाली दिघे यांना टाडा अंतर्गत अटक करण्यात आली. त्यानंतर ते जामिनावर बाहेर होते.

Anand Dighe| Shivsena

टेंभी नाका परिसरात त्यांनी ‘आनंद आश्रम’ स्थापन केला. या आश्रमात दररोज सकाळी जनता दरबार भरत असे. परिसरातील नागरिक दिघेंना त्यांच्या समस्यांबद्दल सांगायचे आणि ते त्या समस्या त्वरित सोडवायचे.

Anand Dighe| Shivsena

एकदा एक महिला त्यांच्याकडे आली आणि तिने आपली समस्या आनंद दिघे यांना सांगितली. महिलेला घर चालवण्यासाठी पिठाची गिरणी सुरु करायची होती, पण परिसरातील कोणत्याही नेत्याने तिची मदत केली नाही.

Anand Dighe| Shivsena

महिलेची समस्या ऐकल्यानंतर आनंद दिघे यांनी ज्या भागात महिला राहते त्या भागातील नगरसेवकाला बोलावलं आणि या महिला तुझ्या जवळ मदतीसाठी आल्या होत्या का?. या प्रश्नाचं उत्तर नगरसेवकाने हो असं उत्तर देताच आनंद दिघे यांनी सर्वांसमोर नगरसेवकाच्या कानशिलात लगावली.

Anand Dighe| Shivsena

त्याच दिवशी नगरसेवकाने महिलेला परवानगी मिळवून दिली आणि दुसऱ्याच दिवशी महिलेची पिठाची गिरणी सुरु झाली.

Anand Dighe| Shivsena

आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटात आनंद दिघे यांची व्यक्तिरेखा अभिनेता प्रसाद ओक साकारत आहे. प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे. समाजमाध्यमांवर सत्तर लाखांपेक्षा अधिक लोकांनी या चित्रपटाचा टिझर बघितला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anand Dighe| Shivsena