हम रहे या ना रहें कल... गायक केके आता आठवणीच सोडून गेले

अनुराधा धावडे

के.के या नावाने प्रसिद्ध असलेले गायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. एका महाविद्यालयात ते लाईव्ह कॉन्सर्टसाठी गेले होते.

KK Death News updates

कॉन्सर्टच्या दरम्यान त्यांनी ''हम रहे या ना रहें कल, कल याद आएंगे ये पल...'', 'आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल, तू जो मिला तो हो गया सब हासिल, नहीं कुछ भी, नहीं कुछ भी... अशी अनेक अप्रितम गाणी गायली होती.

Bollywood Singer KK passes away

लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान के.के यांनी अस्वस्थ वाटत होते. पण ते एक तासाची कॉन्सर्ट पुर्ण करुन आपल्या हॉटेलवर परत आले.

Singer Krishnakumar Kunnath passes away

हॉटेलमध्ये परतल्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

Singer KK passes away

के.के यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्लीत झाला. गायक के.के यांनी हिंदी, तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, मराठी आणि बंगालीसह अनेक भाषांमधील गाणी गायली होती. चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी के.के यांनी जवळपास 35000 जिंगल्स गायल्या आहेत.

kk singer latest news

Krishnakumar Kunnath ( KK )के.के यांनी दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी मल कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले.

Singer KK passes away

1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान, के.के यांनी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी 'जोश ऑफ इंडिया' हे गाणे गायले. त्यांच्या या गाण्यात अनेक भारतीय क्रिकेटर्सही दिसले.

Bollywood Singer KK

के.के यांनी 'पल' या म्युझिक अल्बममधून गाण्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 2021 मध्ये, त्यांना मिर्ची संगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Krishnakumar Kunnath ( KK )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के. के यांच्या निधनाबाबत टि्वट करीत शोक व्यक्त केला आहे. तसेच अनेक बॉलिवूड कलाकारांनीही के.के यांच्यासाठी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मिडीयावर त्यांचे चाहते त्यांच्या मृत्यूपूर्वीचे कॉन्सर्टचे व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

KK Death News update