Rashmi Mane
कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक निकालांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीचे निकाल संध्याकाळपर्यंत स्पष्ट होतील.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने सत्ता स्थापन केली तर पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्या दोघाचे नाव आघाडीवर आहे.
डी. के. शिवकुमार कनकपुरा येथून विधानसभेवर सलग आठ वेळा निवडणून आले आहेत. ते सोनिया गांधी यांचे विश्वासू मानले जातात.
काँग्रेसला बहुमत मिळाले तर सर्वात मोठे नेते म्हणून सिद्धरामय्या यांच्या नाव आघाडीवर आहे. सिद्धरामय्या 2013 पासून साल 2018 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री पदी राहीलेले आहेत.
'सी व्होटर'च्या सर्वेक्षणानुसार काँग्रेसला बहुमत मिळाले तर काँग्रेसचे नेते म्हणून 'सिद्धरामय्या' यांच्या नावाची शक्यता अधिक आहे.
या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री पदाची माळ आता कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.