सरकारनामा ब्यूरो
1937 मध्ये मुरली देवरांचा जन्म झाला. 1968 मध्ये मुंबई महापालिकेचे नगरसेवक ते केंद्रिय पेट्रोलियम मंत्री, हा प्रवास आश्चर्य वाटावे, असे आहे.
1968 साली नगरसेवक म्हणूम निवडून आलेले देवरा हे 1977 साली मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाले.
1982 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर देवरा हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले.
1985 मध्ये देवरा मुंबईतून लोकसभेवर निवडून गेले व संसद सदस्य म्हणून त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली.
देवरा यूपीए सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री होते. मंत्री म्हणूनही त्यांची कामगिरी नेहमी चर्चेत राहिली.
2002 साली ते संसदेच्या वरिष्ठ सभागृह राज्यसभेचे सदस्य देखील झाले.
मुरली देवरा यांना त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या दिवसांमध्ये विविध आजारांनी ग्रासले होते.
24 नोव्हेंबर रोजी 2014 रोजी देवरा यांचं निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचे वय 77 वर्ष होते.