Photo : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित पहा काही दुर्मिळ फोटो!

सरकारनामा ब्युरो

हिंदूत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 ला शिवसेना या पक्षाची स्थापना केली.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

प्रबोधकार ठाकरे, मीनाताई ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेे यांच्या समवेत.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

बाळासाहेब ठाकरे फक्त राजकारणी होते असं नव्हे. तर ते एक उत्तम वक्ता, व्यंगचित्रकार, संपादक तसेच कलेची जाण आणि आदर ठेवणारे व्यक्तीमत्व होते. शिवसेना पक्षाची स्थापना करण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे हे फ्री प्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

बाळासाहेबांची तीनही मुलं (उद्धव, जयदेव आणि बिंदुमाधव), सुना आणि यांच्यासमवेत बाळासाहेब आणि मीनाताई.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

बाळासाहेब ठाकरेंचे त्यांच्या तिन्ही मुलांइतकेच त्यांचे पुतणे राज ठाकरे देखील प्रिय होते. राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्त्वावर बाळासाहेबांचा प्रभाव आजही दिसून येतो.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

शिवसेना स्थापन झाल्यानंतर हळू हळू हे संघटन संपूर्ण महाराष्ट्रात वाढत गेले. प्रमुख पक्षांनादेखील बाळासाहेबांना विचारात घेऊनच आपले राजकीय डावपेच आखावे लागत असे. एका सार्वजनिक कार्यक्रमातला बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचा दुर्मिळ फोटो.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

पॉप स्टार मायकल जॅक्सन याला 1996 साली 'मातोश्री' वर आमंत्रित केले होते.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

पु.ल. देशपांडे, बाळासाहेब ठाकरे आणि भीमसेन जोशी गप्पा मारतानाचा एक दुर्मिळ फोटो.

Balasaheb Thackeray | Sarkarnama
Sarkarnama