Saroj Ahire in winter session : अडीच महिन्यांच्या बाळासह अधिवेशनात; हिरकणीची होतेय राज्यात चर्चा..

सरकारनामा ब्यूरो

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून नागपुरात सुरुवात झाली.

Saroj Ahire | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे आज त्यांच्या अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन विधानभवन परिसरात आल्या. त्यावेळी त्यांनी बाळासह मुख्यमंत्र्याची भेट घेतली.

Saroj Ahire | Sarkarnama

बाळाची आई असतांनाही त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिल्याने त्याचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

Saroj Ahire | Sarkarnama

सरोज अहिरे या नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत.

Saroj Ahire | Sarkarnama

'मतदारसंघातील प्रश्न विधानसभेत मांडणं महत्त्वाचं असून त्यासाठी मी विधानभवनात बाळाला घेऊन आले आहे', असं माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या.

Saroj Ahire | Sarkarnama

बाळाची आई आणि लोकप्रतिनिधी या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे दोन्ही कर्तव्ये एकाचवेळी बजावत असल्याचं सरोज अहिरेंनी म्हटलं आहे.

Saroj Ahire | Sarkarnama
CTA Image | Sarkarnama