नऊ व्होल्टची बॅटरी अन् राजीव गांधींची हत्या, कोण आहे ए.जी. पेरारिवलन?

अनुराधा धावडे

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्याची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज (१८ मे) दिले. ए. जी. पेरारिवलन असे या मारेकऱ्याचे नाव असून तो मागील 31 वर्षांपासून शिक्षा भोगत आहे.

A.G. Perarivalan

ए. जी. पेरारिवलन असे या मारेकऱ्याचे नाव असून तो मागील 31 वर्षांपासून शिक्षा भोगत आहे. न्यायालयाने कलम 142 नुसार प्राप्त विशेषाधिकाराचा वापर करत हा निर्णय दिला.

A.G. Perarivalan

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी याप्रकरणी निकाल दिला आहे. राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तमिळनाडू येथील श्रीपेरंबुदूर येथे हत्या करण्यात आली होती.

A.G. Perarivalan

21 मे 1991 रोजी तमिळनाडू येथील श्रीपेरंबुदूर येथे राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. पेरारिवलन याने जेव्हा राजीव गांधींची हत्या केली तेव्हा तो अवघा १९ वर्षांचा होता. मागील 31 वर्ष तो तुरुंगात होता.

A.G. Perarivalan

1998 मध्ये टाडा न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. 1999 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. पण 2014 मध्ये या शिक्षेचे रुपांतर आजीवन कारावासामध्ये करण्यात आले.

A.G. Perarivalan

राजीव गांधी यांची हत्या करणासाठी पेरारिवलन याने स्फोटक यंत्रासाठी 9 व्होल्टची बॅटरी पुरवल्याचा आरोप होता. नंतर माजी पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले.

A.G. Perarivalan

दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार आणि एलटीटीई सदस्य शिवरासन यांच्यासाठी त्याने दोन बॅटरी खरेदी केल्या. या बॅटऱ्या बॉम्ब बनवण्यासाठी वापरण्यात आल्या. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आला होता.

A.G. Perarivalan

तुरुंगात असतानाही ए.जी.तामिळनाडूच्या मदुराई तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या ए.जी पेरारिवलनने राज्य बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ए.जी. पेरारिवलनला तमिळ संत थिरुवल्लुवर यांच्या कविता आणि प्रवचने वाचण्याची आवड आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

A.G. Perarivalan