Raghuram Rajan: त्या' शोधनिबंधातूनच रघुराम राजन यांनी दिला होता जगाला आर्थिक मंदीचा इशारा

अनुराधा धावडे

भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा आज जन्मदिवस आहे. दिल्ली पब्लिक स्कुलमध्ये रघुराज राजन यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली.

Raghuram Rajan Birthday Special:

दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्यांनी 1985 मध्ये इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी पूर्ण केली

Raghuram Rajan Birthday Special

1987 मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथून बिजनेस एडमिनिस्ट्रेशन मधुन पदव्युत्तर पदविका पूर्ण केली.

Raghuram Rajan Birthday Special:

पीएचडी पूर्ण केल्यानंतर राजन शिकागो विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 2003 मध्ये, त्यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये आर्थिक सल्लागार आणि संशोधन संचालक (मुख्य अर्थशास्त्रज्ञ) म्हणून नियुक्ती झाली.

Raghuram Rajan Birthday Special:

2005 मध्ये त्यांच्या एका वादग्रस्त रिसर्च पेपरने 'Has Financial Development Made the World Riskier?’' ने संपूर्ण आर्थिक जगाला धक्का दिला. अंधाधुंद विकासामुळे जगात आर्थिक संकट ओढवू शकते, असा संदेश त्यांनी या शोधनिबंधातून जगाला दिला.

Raghuram Rajan Birthday Special:

रघुराम राजन हेही 'ग्रुप ऑफ थर्टी'चे सदस्य आहेत. हा जगातील आघाडीच्या अर्थशास्त्रज्ञांचा, आर्थिक व्यवस्थापकांचा आणि शिक्षणतज्ञांचा समूह आहे.

Raghuram Rajan Birthday Special:

2011 मध्ये ते 'अमेरिकन फायनान्स असोसिएशन'चे अध्यक्ष होते आणि सध्या ते 'अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस'चे सदस्यही आहेत.

Raghuram Rajan Birthday Special:

2007 मध्ये त्यांना भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे आर्थिक सल्लागार बनवण्यात आले. त्याच वर्षी त्यांच्या अध्यक्षतेखालील 'आर्थिक सुधारणा समिती'ने आपला अहवाल नियोजन आयोगाला सादर केला.

Raghuram Rajan Birthday Special:

6 ऑगस्ट 2013 रोजी त्यांची आरबीआयचे पुढील गव्हर्नर म्हणून घोषणा करण्यात आली आणि 4 सप्टेंबर 2013 रोजी त्यांची डी. सुब्बाराव यांच्या जागी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Raghuram Rajan Birthday Special: