Anuradha Dhawade
गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्डा आणि बॉलीवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्यातील अफेअर्स ची चर्चा सुरु होती.
दोन महिन्यांपुर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये दोघांनीही एकत्रित स्पॉट कऱण्यात आल्याने त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.
या चर्चांनंतर आता त्यांच्या लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत
सुरुवातीला या केवळ अफवा असल्याच्या चर्चा होत्या पण आता त्यांच्या नात्यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
येत्या १३ मे रोजी राजधानी दिल्लीत राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा साखरपुडा करणार असल्याची माहिती आहे.
दोघांच्याही साखरपुड्याची बातमी व्हायरल होऊ लागल्यानंतर आता चारी बाजूने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे
पण अद्यापही परिणीत आणि राघव यांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणताही दुजोरा दिलेला नाही.
सुरुवातीला परिणीती आणि राघव ऑक्टोबर महिन्यात लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या
मुंबईच्या हॉटेलमध्ये दोघेजण सोबत स्पॉट झाल्यानंतर त्यांच्या लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या चर्चांना ऊत आला होता.