सरकारनामा ब्युरो
परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मैत्रीपूर्ण संबंध अधोरेखित झाले. यावरीन दोन्ही देशातील मैत्रीपूर्ण संबंध किती घट्ट आहेत यावरून लक्षात येते.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युयल मॅक्रॉन यांची भेट घेतली. यावेळी संरक्षण, अणुऊर्जा आणि अन्न सुरक्षा अशा विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
परिषदेदरम्यान त्यांनी क्रिस्टालिन जॉर्जिया आणि गिता गोपीनाथ यांचीही भेट घेतली.
सिंगापूरचे पंतप्रधान 'ली हिसियन लूंग' यांच्याशी भेट झाली आहे. यावेळी हरित अर्थव्यवस्था, नूतनीकरणक्षम ऊर्जा, फिनटेक यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारत-सिंगापूर संबंध दृढ करण्यावर चर्चा केली.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची यावेळी भेट झाली.
ब्रिटनचे पंतप्रधान 'ऋषी सुनक' यांची भेट झाली. यावेळी त्यांच्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रोलियाचे पंतप्रधान 'अल्बानीज' यांच्याशीही भेट झाली.