पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्लिनमध्ये दाखल; भारतीयांकडून जल्लोषात स्वागत

अनुराधा धावडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसीय युरोप दौऱ्यावर आहेत. आज पहाटे (युरोपीय वेळेनुसार) जर्मनीची राजधानी बर्लिन विमानतळावर ते दाखल झाले. बर्लिनमध्ये भारत-जर्मनी IGC बैठकीत सहभागी होणार आहेत.

PM Modi Europe Visit

जेव्हा पंतप्रधान मोदी भारतीय समुदायाच्या लोकांमध्ये पोहोचले तेव्हा भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या.

PM Modi Europe Visit

लहान मुलांपासून महिला आणि तिथे जमलेले सगळेच पंतप्रधान मोदींची झलक पाहण्यासाठी आतुर दिसत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनीही सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

PM Modi Europe Visit

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हॉटेल एडलॉन केम्पिंस्की येथे आगमन होताच भारतीय नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदींनीही लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

PM Modi Europe Visit

यावेळी त्यांनी अगदी लहान मुलाकडून गाणं ऐकलं. पंतप्रधानांची भेट घेत असताना काही लोकांनी भारत माता की जयच्या घोषणाही दिल्या.

PM Modi Europe Visit

मन्या मिश्रा नावाची मुलगीही पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी बर्लिनला पोहोचली. यावेळी तिने आपली पेंटिंगही पंतप्रधाने मोदींना दाखवली आणि ते आपल्या भारताचे पंंतप्रधान असल्याचा आपल्याला अभिमान आहे, अशा भावनाही व्यक्त केल्या .

PM Modi Europe Visit

इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका आणि सेनेगलचे नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. जर्मनीतूनहू लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रणाची घोषणा केली जाऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi Europe Visit