Maharastra Kesari : सांगलीची लेक ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी; कोण आहे प्रतीक्षा बागडी?

सरकारनामा ब्यूरो

पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचा मान पटकावणारी प्रतीक्षा बागडी ही मूळची सांगलीच्या तुंग गावची आहे.

Pratiksha Bagdi | Sarkarnama

प्रतीक्षा ही 21 वर्षांची असून ती सांगली येथील एका कुस्ती केंद्रात सराव करते. तिने या आधी अनेक स्पर्धेतही अनेक पदके पटकावली आहेत.

Pratiksha Bagdi | Sarkarnama

प्रतीक्षा बागडीने गुणांच्या बरोबरीत असलेल्या वैष्णवी पाटीलला आपल्या खास शैलीतील लपेट डावातून चितपट केले.

Pratiksha Bagdi | Sarkarnama

सांगलीची प्रतीक्षा बागडी शुक्रवारी (दि.24 मार्च) पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली.

Pratiksha Bagdi | Sarkarnama

परिस्थितीमुळे वडिलांना कुस्तीची आवड सोडावी लागली होती. त्यांच स्वप्न मी पूर्ण केलं, असं म्हणत महाराष्ट्र केसरी पुरस्कार पटकावल्यावर प्रतिक्षा भावूक झाली.

Pratiksha Bagdi | Sarkarnama

महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगलीत ही महिला कुस्ती स्पर्धा पार पडली.

Pratiksha Bagdi | Sarkarnama

मान्यवरांकडून विजेत्या प्रतिक्षाला चांदीची गदा, महाराष्ट्र केसरी किताब आणि रोख 51 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.

Pratiksha Bagdi | Sarkarnama

Next : भारतातील पहिल्या महिला 'IAS' अधिकारी तुम्हाला माहीत आहे का?

Sarkarnama