MP Balu Dhanorkar: कट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचे खासदार; असा होता बाळू धानोरकरांचा राजकीय प्रवास!

Ganesh Thombare

प्राणज्योत मालवली

काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांची आज मंगळवारी (दि.30 मे) प्राणज्योत मालवली.

Balu Dhanrokar | Sarkarnama

17 वर्षाचा राजकीय प्रवास

कट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचे खासदार असा 17 वर्षाचा राजकीय प्रवास बाळू धानोरकर यांचा राहिला.

मूळ गाव

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे मूळ गाव आहे.

राजकारणाला सुरवात

ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांना प्रेरित होऊन धानोरकरांनी शिवसेनेत प्रवेश करत राजकीय सुरवात केली.

यशाने हुलकावणी दिली

शिवसेनेच्या शाखेचे प्रमुख, जिल्हा प्रमुख, 2009 ला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी केली. पण यात थोड्या मतांनी पराभव झाला.

आमदारकी जिंकली

2014 ला धानोरकर यांनी शिवसेनेच्या तिकिटावर आमदारकी जिंकली.

काँग्रेसमध्ये प्रवेश

2019 ला बाळू धानोरकर यांनी काँग्रेस नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

काँग्रेसकडून खासदार

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातून उमेदवारी मिळवत ते खासदार झाले.

मोदी लाटेत निवडून आले

2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी लाटेत निवडून आलेले बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले.

Next: आशिष शेलार यांच्या भेटीनंतर रोहित पवार यांच्याकडून फोटो शेअर; म्हणाले...