असा होता मुलायमसिंह यादव यांचा राजकीय प्रवास

अनुराधा धावडे

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे आज निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

Mulayamsingh Yadav Passes Away

मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील सैफई गावात झाला.

Mulayamsingh Yadav Passes Away

उत्तर प्रदेशच्या राजकीय जगतात मुलायमसिंह यादव यांना प्रेमाने नेताजी म्हटले जाते.मुलायम सिंह यांनी 1960 मध्ये पहिल्यांदा भारतीय राजकारणात प्रवेश केला.

Mulayamsingh Yadav Passes Away

1967 मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

Mulayamsingh Yadav Passes Away

1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या काळात मुलायमसिंह यादव यांनी 19 महिने तुरुंगवास भोगला.

Mulayamsingh Yadav Passes Away

आपल्या 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत, ते 1989 मध्ये पहिल्यांदा युपीचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1993 मध्ये दुसऱ्यांदा आणि 2003 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला.

Mulayamsingh Yadav Passes Away

1996 एच.डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते संरक्षणमंत्री होते.पण हे सरकार फार काळ टिकू शकले नाही

Mulayamsingh Yadav Passes Away

मुलायमसिंह यादव पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही आघाडीवर होते, पण त्यांच्या नातेवाईकांनी साथ न दिल्यामुळे त्यांचे पंतप्रधान पदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

Mulayamsingh Yadav Passes Away

मुलायम सिंह यांनी उत्तर प्रदेशात सामाजिक सलोखा राखण्यात मोठे योगदान दिले. एक धर्मनिरपेक्ष नेता म्हणून त्यांनी संपूर्ण युपीत स्वतची ओळख निर्माण केली.

Mulayamsingh Yadav Passes Away