Delhi Mumbai expressway : सहा राज्यांमधून जाणारा देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे...

सरकारनामा ब्युरो

दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे रविवारी(ता.१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धघाटन होत आहे.

Delhi Mumbai expressway | sarkarnama

दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे 1,386 किमी लांबीसह भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे असणार आहे.

Delhi Mumbai expressway | sarkarnama

सोहना (हरियाणा)-दौसा (राजस्थान) सेक्शन हा नवी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे मार्गाचा पहिला टप्पा आहे.हा महामार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून जाईल.

Delhi Mumbai expressway | sarkarnama

हा महामार्ग कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सुरत या प्रमुख शहरांना देखील जोडेल.दिल्ली आणि मुंबई दरम्यानचे प्रवासाचे अंतर 1,424 किमीवरून 1,242 किमीपर्यंत 12% कमी होईल.

Delhi Mumbai expressway | sarkarnama

दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ 24 तासांवरून 50% कमी करून 12 तासांवर येईल.हा आठ लेनचा एक्स्प्रेस वे आहे, जो 12 लेनपर्यंत सहज वाढवता येईल.

Delhi Mumbai expressway | sarkarnama

एक्सप्रेसवे 93 पीएम गति शक्ती आर्थिक नोड्स, 13 बंदरे, 8 प्रमुख विमानतळ आणि 8 मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क (MMLP) देखील सेवा देतील.

Delhi Mumbai expressway | sarkarnama

'भारतमाला प्रकल्प'च्या पहिल्या टप्प्याचा एक भाग म्हणून हा एक्सप्रेसवे बांधला जात आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे मार्च 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Delhi Mumbai expressway | sarkarnama