Republic Day : प्रजासत्ताकदिनी PM मोदी फडकवत नाहीत झेंडा; काय आहे कारण?

सरकारनामा ब्यूरो

भारत यावेळी ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत.

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस भारतीयांसाठी खूप खास आहे.

राजधानी दिल्लीत या दिवशी एक भव्य संचलन आयोजित केले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्टला लाल किल्यावर ध्वज फडकवतात. पण २६ जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी ते ध्वज फडकवत नाहीत. 

२६ जानेवारी १९५० रोजी लागू केलेल्या भारतीय संविधानाची आठवण म्हणून साजरा केला जातो. 

स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली. तेव्हा राष्ट्रपती पदाची शपत घेणारे डॉ. राजेंद्र प्रसाद हे देशाचे घटनात्मक प्रमुख होते.

डॉ. राजेंद्र प्रसाद घटनाप्रमुख असल्यामुळे त्यांनी २६ जानेवारीला राष्ट्रपती तिरंगा फडकवला आणि तेव्हापासून आजतागायत ही परंपरा अशीच सुरु आहे.

त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी नरेंद्र मोदी ध्वजारोहण करणार नाहीत. तर हे काम करण्याचा मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे असेल.