20 Years Of PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान, वाचा दहा उल्लेखनीय कामगिरींची नोंद

Mangesh Mahale

2001 या वर्षी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणतेही उच्च पद नसताना त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्याला 20 वर्षे झाली आहेत. तेव्हापासून ते सत्तेच्या शीर्षस्थानी आहेत. हे तुम्ही ते दिवसांमध्ये मोजले तर ते 7285 दिवसांपासून सत्तेत टॉपवर आहेत.

PM Narendra Modi | sarkarnama

2001 ते 2014 पर्यंत म्हणजेच 12 वर्षे 227 दिवस (एकूण 4607 दिवस) मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.

PM Narendra Modi | sarkarnama

2014 मध्ये ते देशाचे 14वे पंतप्रधान म्हणून निवडून आले. तेव्हापासून त्यांनी पीएमओमध्ये 2671 दिवस घालवले आहेत.

PM Narendra Modi | sarjarnama

जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यानंतर ते दीर्घकाळ निवडून आलेल्या सरकारचे नेतृत्व करणारे चौथे पंतप्रधान आहेत.

PM Narendra Modi | sarkarnama

पंडित नेहरू 6130 दिवस पंतप्रधानपदावर राहिले, तर इंदिराजींनी 5829 दिवस पंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली. तर मनमोहन सिंग 3655 दिवस पंतप्रधान राहिले. मोदींना नेहरूंचा विक्रम मोडायचा असेल तर त्यांना मार्च 2031 पर्यंत पंतप्रधानपदी राहावे लागेल.

PM Narendra Modi | sarkarnama

पंतप्रधान बनलेल्या इतर मुख्यमंत्र्यांमध्ये नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री म्हणूनचा कार्यकाळ सर्वात जास्त काळ राहिला आहे. ते 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते.

PM Narendra Modi | sarkarnama

देशातील 14 पैकी 6 पंतप्रधान असे आहेत ज्यांनी मुख्यमंत्रिपदाची शोभा वाढवली आहे. पंतप्रधान मोदी त्यापैकी एक आहेत.

PM Narendra Modi | sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजवरचा भाजपचा सर्वात विश्वासू चेहरा ठरले आहे. त्यांनी एकदा नव्हे तर अनेक वेळा राज्य आणि देशपातळीवरील निवडणुका जिंकल्या आहेत.

PM Narendra Modi

2014 पासून, पीएम मोदी भाजपच्या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाचा चेहरा आहेत आणि पक्षाने अनेक वेळा विजय मिळवला आहे.

PM Narendra Modi

2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळवणारे भाजप 1984 नंतर देशातील पहिला पक्ष ठरला. पाच वर्षांनंतर 2019 मध्ये भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला आणि 300 पेक्षा जास्त जागा मिळवल्या. यामध्ये त्यांची मतांची टक्केवारी 37.36 होती जी एक विक्रम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.