Anuradha Dhawade
ऑस्ट्रेलियाचे १७ वे राष्ट्राध्यक्ष हॅरोल्ड एडवर्ड होल्ट यांनी २६ जानेवारी १९६६ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली.
पण पंतप्रधान होण्यापूर्वीच हॅरोल्ड हॉल्ट यांच्यावर ऑस्ट्रेलियामध्ये चीनसाठी हेरगिरी केल्याचा आरोपही करण्यात आला होता.
चीनमधील कुओमिंतांगच्या गुप्तचर सेवेतील एका विभागात हॅरोल्ड हॉल्ट यांची नियुक्ती करण्यात आली होती.
हॉल्ट यांनी ऑस्ट्रेलियातील महत्त्वाची माहिती चीनला पुरवण्यास सुरुवात केली. चीनच्या कम्युनिस्ट क्रांतीच्या विघटनानंतर हॉल्ट पुन्हा स्लीपर एजंट बनले.
मधल्या काही वर्षांत त्यांनी चीनसाठी हेरगिरी करणे थांबवले. पण पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी आपल्या देशाची माहिती चीनला पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला.
ऑस्ट्रेलियाची गुप्तचर यंत्रणा सिक्युरिटी इंटेलिजन्स ऑर्गनायझेशनने 1967 मध्ये पंतप्रधान असताना हॉल्ट यांच्यावर हेरगिरीचा संशय व्यक्त करण्यास सुरुवात केली.
चीनने हॅरोल्ट यांच्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांच्या बचावासाठी एक पानबुडी तैनात केली होती.
गुप्तचर यंत्रणांकडून होणाऱ्या हेरगिरीच्या संशयामुळे हॅरोल्ट यांनी स्वत:च्याच मृत्यूचे नाटक रचले.
हॅरोल्ट हॉल्ट ऑस्ट्रेलियाच्या शेवियॉट समुद्र किनाऱ्यावर पोहायला म्हणून गेले. त्यानंतर ते पुन्हा कधीच दिसले नाहीत.
समुद्रात जाताच चीनच्या पानबुडीने ते चीनला पळून गेले, त्यानंतरचे संपुर्ण आयुष्य त्यांनी चीनच्या बिजींग मध्ये व्यतीत केले. अशी आख्यायिका आहे. पण आजपर्यंत याची पुष्टी कोणीही करु शकले नाही.