Photo's : संजय राऊतांचे 'ते' 100 दिवस!

सरकारनामा ब्यूरो

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना शंभर दिवसानंतर आज जामीन मिळाला आहे.

Sanjay Raut | Sarkarnama

31 जुलै 2022 रोजी संजय राऊत  यांना अटक करण्यात आली होती. 

Sanjay Raut | Sarkarnama

अटक झाल्यानंतर संजय राऊत हे आर्थर रोड कारागृहात होते. राऊतांना पोलिस कोठडी आणि नंतर त्यांची न्यायालयीन कोठडी झाली. तेव्हा पासून राऊत हे आर्थर रोड कारागृहामध्ये होते.

Sanjay Raut | Sarkarnama

संजय राऊत यांना मागील अनेक दिवसांपासून जामीन नाकारण्यात येत होता.

Sanjay Raut | Sarkarnama

कोठडीत असतांना राज्यात राजकीय घडामोडीवर ते लक्ष ठेऊन होते. यावेळी ते वर्तमानपञ आणि पुस्तकाचे वाचन करत होते, अशी माहिती मिळत होती.

Sanjay Raut | Sarkarnama

आई..मी लवकरच परत येईन...संजय राऊत यांना जामीन नाकारल्यानर कोठडीतून त्यांचं आईला भावनिक पत्र लिहीले होते. याची माध्यमांमद्धे चर्चा होती.

Sanjay Raut | Sarkarnama

ईडीकडून पुन्हा राऊतांच्या जामिनाविरोधात हायकोर्टात अपील केली होती. यावर आता उद्या सुनावणी होणार आहे. मात्र राऊतांच्या जामिनास स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. 

Sanjay Raut | Sarkarnama

आज ईडीच्या पीएमएलए कोर्टातून त्यांना जामीन मिळाला आहे. सध्यातरी राऊतांना दिलासा मिळाला असून ते आज संध्याकाळपर्यंत कारागृहाबाहेर येतील.

Sanjay Raut | Sarkarnama
Web Photo | Sarkarnama