Rajiv Gandhi Death Anniversary : भारतात तंत्रज्ञानाची क्रांती घडविणारा 'लोकनेता'...

Deepak Kulkarni

जन्म

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी झाला.

Rajiv Gandhi Death Anniversary | SARKARNAMA

राजकीय वारसा

राजीव गांधी यांनी जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा राजकीय वारसाच चालवला नाही तर देशाला तंत्रज्ञान आणि जागतिक उंचीवर नेण्याचे अभूतपूर्व कार्यही केले.

Rajiv Gandhi Death Anniversary | SARKARNAMA

व्यावसायिक पायलट

राजकारणात येण्यापूर्वी राजीव गांधी व्यावसायिक पायलट होते. त्यांनी 1970 मध्ये एअर इंडियामधून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

Rajiv Gandhi Death Anniversary | SARKARNAMA

पंतप्रधान म्हणून नेहरू-गांधी कुटुंबातील शेवटचे सदस्य

पंतप्रधान म्हणून राजीव गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातील शेवटचे सदस्य होते. त्यांच्यानंतर गांधी कुटुंबीय राजकारणात असले तरी पंतप्रधानपदावर कोणीही विराजमान होऊ शकले नाही.

Rajiv Gandhi Death Anniversary | SARKARNAMA

सोनिया यांच्याशी विवाह...

इंग्लंडमधील केंब्रिज येथे असतांना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियांशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला.

Rajiv Gandhi Death Anniversary | SARKARNAMA

पंतप्रधानपदी विराजमान...

इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो १९८४ ते २ डिसेंबर १९८९ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते.

Rajiv Gandhi Death Anniversary | SARKARNAMA

स्वच्छ आणि निष्कलंक प्रतिमा....

त्यांची प्रतिमा नेहमीच स्वच्छ आणि निष्कलंक होती. 1980 मध्ये जेव्हा त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले, तेव्हा त्यांना मिस्टर क्लीन मानले गेले.

Rajiv Gandhi Death Anniversary | SARKARNAMA

प्रतिमा मलिन झाली...

बोफोर्स घोटाळ्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर १९८९च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले

Rajiv Gandhi Death Anniversary | SARKARNAMA

हत्या ....

गांधी यांची 21 मे 1991 रोजी आत्मघातकी बॉम्बस्फोटात हत्या करण्यात आली होती.

Rajiv Gandhi Death Anniversary | SARKARNAMA

कुटुंब राजकारणात सक्रीय...

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियंका गांधी या राजकारणात आहेत.

Rajiv Gandhi Death Anniversary | SARKARNAMA

भारतरत्न पुरस्कार

गांधी यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Rajiv Gandhi Death Anniversary | SARKARNAMA

NEXT : कर्नाटक मंत्रिमंडळातील कोट्याधीश मंत्री तुम्हाला माहिती आहे का?