ठोको ताली... नवज्योतसिंग सिद्धूच्या राजीनाम्याने काॅंग्रेसमध्ये लाफ्टर शो!

सरकारनामा ब्युरो

आज कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपुर्द केला. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यामागे अनेक कारणे आहेत.

navjyot singh sidhu

नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ''माणसाच्या चारित्र्य पतनाला तडजोडीतून सुरुवात होते.. मी कधीही पंजाबच्या कल्याणाच्या भवितव्याशी तडजोड करु शकत नाही.''

navjyot singh sidhu

नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत झालेल्या वादानंतर काँग्रेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेतला होता. त्यामुळे ते नाराज झाले होते.

navjyot singh sidhu

पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील वाद मिटण्याची आशा काँग्रेस हायकमांडला होती.

navjyot singh sidhu

पण तसं न होता हा वाद अधिक चिघळत गेला. शेवटी कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. सिद्धू यांनी राजीनामा देण्यामागे अनेक कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

navjyot singh sidhu

1. नव्या मंत्रिमंडळात खातेवाटप करताना त्यांना हायकमांडने सहभागी करुन घेतलं नाही, पोर्टफोलिओ ठरवताना त्यांना विचारले गेले नाही

navjyot singh sidhu

2.कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पद सोडल्यानंतरच काँग्रेस हायकमांडने चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री केले. पण पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे नवज्योतसिंग सिद्धू खूश नव्हते.

navjyot singh sidhu

नव्या मंत्रिमंडळात सुखविंदरसिंग रंधावा यांना गृहमंत्री पद देण्यात आले आहे. मात्र याला नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विरोध होता.

navjyot singh sidhu

तर दूसरीकडे, कॅप्टन अमरिंदर सिंग हे दिल्लीसाठी आज संध्याकाळी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

navjyot singh sidhu

जर नवज्योतसिंह सिद्धू काँग्रेसचा चेहरा असतील तर त्यांच्या पराभवासाठी आपण कोणताही त्याग करायला तयार असल्याचं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे.

navjyot singh sidhu

जर नवज्योतसिंह सिद्धू काँग्रेसचा चेहरा असतील तर त्यांच्या पराभवासाठी आपण कोणताही त्याग करायला तयार असल्याचं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

navjyot singh sidhu