Padma Awards : 2023च्या पद्म पुरस्काराचे मानकारी

सरकारनामा ब्यूरो

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बुधवारी (२२ मार्च) संध्याकाळी पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.

Padma Award | Sarkarnama

यावेळी 50 जणांना बुधवारी पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

Padma Award | Sarkarnama

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोक कलेसाठी नाडोजा पी. मुनिवेंकटप्पा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

Padma Award | Sarkarnama

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 'एसएम कृष्णा' यांना पद्मविभूषण प्रदान केला. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'यूपीए' सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री होते आणि नंतर भारतीय जनता पक्षात सामील झाले.

Padma Award | Sarkarnama

'जोधैया बाई बेगा' यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. बेगा चित्रकलेतील एक प्रमुख कलाकार आहेत. त्यांनी बैगा जमातीच्या पारंपारिक कार्य, तत्वज्ञान आणि संस्कृतीला ओळख मिळवून दिली आहे.

Padma Award | Sarkarnama

प्रा. प्रकाश चंद्र सूद यांना पद्मश्री प्रदान करण्यात आला. एक प्रख्यात आण्विक संशोधक आणि शास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे.

Padma Award | Sarkarnama

सामाजिक कार्यासाठी 'हिरबाईबेन इब्राहिमभाई लोबी' यांना पद्मश्री प्रदान करण्यात आला. गुजरातमधील सिद्दी समाजासाठी केलेल्या कामांसाठी आणि सौराष्ट्र प्रदेशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या ओळखल्या जातात.

Padma Award | Sarkarnama

प्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना पद्म भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चार दशकांच्या कारकिर्दीत सुमन कल्याणपूर यांनी हिंदी, मराठी आणि अन्य 11 भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

Padma Award | Sarkarnama

विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी प्रा. (डॉ) महेंद्र पाल यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. ते भारतातील पशुवैद्यकीय मायक्रोलॉजीचे प्रणेते आहेत.

Padma Award | Sarkarnama

Next :16व्या वर्षी कुटुंबाशी 'पंगा' घेत, बनली बॉलिवुड 'क्विन'