Maharashtra Din: महाराष्ट्र दिनानिमित्त 'मराठीबाणा' या खास कार्यक्रमाचे आयोजन, पाहा खास फोटो !

Rashmi Mane

कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अशोक हांडे यांच्या मराठी बाणा या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Eknath Shinde | Sarkarnama

९० फिट मार्गावर या कार्यक्रमाचे आयोजन

शिवसेना कळवा, खारीगाव, विटावा शाखेच्या वतीने कळवा पश्चिम येथील नव्वद फिट मार्गावर हा कार्यक्रम घेण्यात आला.

Eknath Shinde | Sarkarnama

मुख्यमंत्र्यानी मांडले मनोगत

राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे अनेक कल्याणकारी निर्णय घेतले असल्याचे, यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपले मनोगत मांडले.

Eknath Shinde | Sarkarnama

३१७ दव्याख्यान्याचे उद्घाटन

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यभरात ३१७ ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत.

Eknath Shinde | Sarkarnama

मुंबई महानगरपालिका निवडणूक

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याची आवई उठवली जाते, मात्र प्रत्यक्षात मुंबईला कुणीही महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही हेच सत्य असल्याचे निक्षून सांगितले.

Eknath Shinde | Sarkarnama

एकनाथ शिंदे नागरिकांशी संवाद

महायुती सरकारच्या कामाचा झपाटा सहन होत नसल्यानेच विरोधकांची पोटदुखी वाढली असून त्यांच्या पोटात बुरगुंडा झाला आहे. हा बुरगुंडा दूर करण्याचे काम आपला दवाखाना नक्कीच करेल असेही यावेळी शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde | Sarkarnama

नवीन प्रकल्प जाहीर

 ९० फिट मार्ग देखील लवकरच पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार असून त्याद्वारे या भागात राहणाऱ्या रहिवाशांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल असेही यावेळी जाहीर केले.

Eknath Shinde | Sarkarnama

मोठ्या संख्येने लोक उपस्थित

या कार्यक्रमासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कळवा, खारीगाव, विटावा विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Eknath Shinde | Sarkarnama

Next: लग्नाचा फोटो शेअर करत यशोमती ठाकुरांची भावूक पोस्ट...